Share

कोविड सेंटरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी, विधानसभेतही तीव्र पडसाद

Published On: 

औरंगाबाद : राज्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये आता औरंगाबादमधील डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटनेची भर पडली आहे. औरंगाबादच्या पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून गुरुवारी सकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर हा अहवाल वरिष्ठापर्यंत पोहोचला असून महानगरपालिकेकडून डॉक्टरची हकालपट्टी केल्याची माहिती औरंगाबाद आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली आहे.

रात्रीच्या वेळी कोविड सेंटरमध्ये राऊंडवर असलेल्या डॉक्टरने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड करताच डॉक्टरने तेथून पळ काढला. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

महानगरपालिकेकडून डॉक्टरची हकालपट्टी केल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे. सदरील घटनेची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे देखील पाडळकर म्हणाल्या. मात्र सदरील प्रकरणी महिलेने कुठलीही तक्रार दिलेली नाही त्यामुळे कायदेशीर कारवाईबाबत कुठलीही माहिती समजलेली नाही.

विधानसभेत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगाबाद शहरातील या घटनेचे पडसाद उमटले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला याबाबत धारेवर धरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत अहवाल आला असून डॉक्टरला बडतर्फ केले असल्याची माहिती दिली आहे. तसेच हि केस बलात्काराची नसून विनयभंगाची आहे संबंधित प्रकार हा अतिशय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!