Share

‘सरकारला लाज वाटायला हवी’ इंधन दरवाढीवरून प्रकाश राज आक्रमक !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.

दरम्यान,अभिनेते प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सरकारला लाज वाटायला हवी’ असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

‘गेल्या तीन महिन्यांत गॅस सिलिंडची किंमत 225 रुपयांनी वाढली आहे.’ अशा आशयाचं ट्विट केलं असून सरकारला लाज वाटायला हवी असं म्हणत बोचरी टीका केली आहे. गेल्या तीन महिन्यांत 1 डिसेंबर, 1 जानेवारी, 4, 15, 25 फेब्रुवारी, 1 मार्च रोजी सिलिंडरच्या दरात कशी वाढ झाली याबाबत माहिती त्यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे. एलपीजीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!