🕒 1 min read
औरंगाबाद: कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन महानगरपालिकेचे वाॅररूम स्मार्ट सिटीच्या नवीन कार्यालयात स्थलांतरित करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय(Aastik Kumar Pandey) यांनी बुधवारी दिले. पुढील आठवड्यात वाॅर रूम स्मार्ट सिटी कार्यालयात सुरु होणार आहे. या वाॅर रूम मधून २४ तास होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्याचे तसेच संभाव्य कोरोनाचे वाढते रुग्ण संख्या गृहीत धरून त्यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेशही मनपा प्रशासकांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना दिले.
शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत असून त्यांना होम क्वारंटाइन करून उपचार करण्यात येत आहे. तसेच त्यांना यासंदर्भात गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यांच्यावर चोवीस तास वाॅर रूम मधून नियंत्रण केले जाणार आहे. त्या रुग्णांना रुग्णाना सोयीसुविधा व औषध पुरवण्याचे तसेच त्यांची काळजी घेण्याचे निर्देश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. वाॅर रूम मधून सतत त्यांना संपर्क करून रूग्णाच्या आरोग्याची विचारपूस करून त्यांना तातडीने केली जाणार आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये काही लक्षणे आढळून आल्यास त्यांना दवाखान्यात शिफ्ट करण्यासाठी, तसेच टेस्टिंग करणे आदी साठी अँम्ब्युलन्स मागवणे यासाठी वाॅर रूम मधून विविध हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
-
“उत्पल पर्रीकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास आमचा पाठींबा”,संजय राऊतांचा मोठा दावा
-
राज्यात महाविकासआघाडीने केला भाजपचा सुपडा साफ; रोहित पवारांची रोखठोक पोस्ट
-
धक्कादायक! साताऱ्यात माजी सरपंचाने केली गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण
-
“आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय…”, किरण मानेंची ‘या’ चित्रपटात लागली वर्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
