Share

राज्यातील शाळा सुरू होणार; मात्र औरंगाबादेतील विद्यार्थ्यांना करावी लागणार आणखी ८ दिवस प्रतिक्षा..!

Published On: 

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाने शाळा सुरू करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ घेतला आहे. त्यामुळे शाळा, पालक तसेच विद्यार्थ्यांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद येथील कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहून आठ दिवसानंतर निर्णय घेतला जाईल असे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी सांगितले.

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही खबरदारी घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या गेल्या आहेत. याबाबत वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं २४ जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील.

औरंगाबाद शहरात गेल्या दोन दिवसात सातशेहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतरच शहरातील शाळा सुरू होतील की नाही याबाबत निर्णय जाहीर केला जाईल. राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याचे अधिकार दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद मनपा आयुक्तांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरू करण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!