Share

संत एकनाथ रंग मंदिराच्या खाजगीकरणावरून ‘मनसे’ आक्रमक; महापालिकेविरोधात आंदोलन..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराच्या कामाचे खाजगीकरण करण्याचा घाट औरंगाबाद महापालिकेने घातला आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने(Maharashtra Navnirman Sena) सोमवारी(दि.२४) रस्त्यावर उतरून आंदोलन केले. औरंगाबाद महानगरपालिकेचे करायचं काय; खाली मुंडकं वर पाय? आयुक्त जवाब दो, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. खाजगीकरणाविरोधात मनसे आक्रमक झाली असून महानगरपालिकेने खासगीकरण रद्द करावे अन्यथा मनसे याहीपेक्षा मोठे आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

महानगरपालिका प्रशासनाने संत एकनाथ रंग मंदिर नाट्यगृहाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी १७ जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. तसेच मनपाने निर्णय मागे न घेतल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा ईशाराही यावेळी देण्यात आला होता. आयुक्तांनी या निवेदनाला कुठलेही उत्तर न दिल्याने संतप्त झालेल्या मनसैनिकांनी संत एकनाथ रंग मंदिराच्या खाजगीकरणाविरोधात आज रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मनसेने यावेळी म्हटले, संत एकनाथ रंगमंदिराचे मंगळवारी लोकार्पण होणार आहे. आम्ही या लोकार्पणाचे स्वागत करतो.

२०१७ साली सुरु झालेले काम २०२२ ला पूर्ण होत आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांचा मोठ्या संघर्षानंतर विजय झाला असं म्हणता येईल. संत एकनाथ रंगमंदिराचे नुतणीकरण करण्यासाठी आपण तब्बल १० कोटी रुपये खर्च केलेत. इतक्या पैशात नवीन रंगमंदिर बांधुन झाले असते. हे देखील आपण जाणता, तरी शहरासाठी आम्ही हे देखील डोळे बंद करुन मान्य केले. कारण आम्हाला संत एकनाथ नाट्य मंदिर हवं आहे. हे सर्व असतांना आम्हाला झटका त्यावेळी बसला ज्यावेळी आपण याचे खाजगीकरण करणार आहात हे समजले.

मुळात इतका प्रचंड खर्च करुन खाजगीकरण कां केल ? आता हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याचा विरोध करण्यासाठी लोकाशाही मार्गाने आम्ही आठ दिवसापूर्वी महानगरपालिका आयुक्त यांना पत्र दिले होते. परंतु त्याचे उत्तर देखील देण्याची तसदी आयुक्तांनी घेतली नाही. रंगमंदिराच्या खाजगीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे, १० कोटी रुपये खर्च झाल्यानंतर इतकी चांगली मालमत्ता आपण कंत्राटदाराच्या घश्यात का घालत आहात ? यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा वैयक्तिक स्वार्थ दिसत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यासह मनसैनिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!