ललितपूर : १०० अपराधी सुटले तरीही चालतील मात्र एकाही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये असे म्हटले जाते मात्र विष्णू तिवारी यांच्या बाबत जे घडले आहे त्यामुळे आज अनेक प्रश्न उपस्थित करायला वाव मिळाला आहे .बलात्काराच्या आरोपात २० वर्षांपासून तुरुंगात असलेल्या विष्णू तिवारी नावाच्या व्यक्तीची उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. त्यांना ३ वर्षे ललितपूरच्या, तर १७ वर्षे केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आलं होतं.
ललितपूरमधल्या महरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिलावन गावातल्या महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानं विष्णू यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.या प्रकरणात गेल्या २० वर्षांपासून तुरुंगात असलेल्या विष्णू यांची दोनच दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. तिवारी २३ वर्षांचे असताना ट्रायल कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.त्यावेळी ते बलात्काराच्या आरोपात दोषी आढळले होते.
20 वर्षांच्या तुरूंगवासानंतर हायकोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. तुरूंगातून सुटल्यानंतर जेव्हा ते त्याच्या गावी पोहचले तेव्हा लोकांनी त्यांचे स्वागत केले. विष्णू तिवारी जरी सांगत असले कि निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना आनंद झाला आहे, परंतु हे सांगताना त्यांचा चेहरा सांगत होता की या 20 वर्षात त्याने जे गमावले ते पुन्हा ते मिळवू शकत नाही.
विष्णू तिवारी यांचे दुर्दैव हे होते की 20 वर्षांच्या तुरूंगात असताना एकदा सुद्धा जामीन मिळाला नाही कोरोना काळात अनेक कैदी पॅरोलवर बाहेर आले परंतु त्यांना या काळात देखील बाहेर पडता आले नाही..या 20 वर्षात त्याने काय गमावले हे आठवते तेव्हा त्याचे डोळे पाणावतात. खटला लढताना त्यांचे पालक आणि दोन भावांचा मृत्यू झाला. कुटुंबाकडे असलेली पाच एकर जमीनही विकली गेली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणं हा मर्दपणा नाही,अशा लोकांना लाज वाटायला हवी’
- श्रुती मराठेच्या अदांवर चाहते घायाळ ; सोशल मीडियावर श्रुतीचा जलवा !
- अहमदपूरात शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा एकर उस जळून खाक
- पूजा चव्हाण प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट; भाजपच्या ‘या’ नेत्याने पूजाचा लॅपटॉप चोरल्याची चर्चा
- संचारबंदी काळात व्यापाराना दिलासा देणारी बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
