मुंबई : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमधील उदयपूर येथे हत्या झाली आहे. यामुळे संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे. या हत्याप्रकरणामुळे राजस्थानमधील काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपींनी हत्येचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रकरणावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आता अभिनेत्री कंगना रणौतने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला हत्या झालेल्या कन्हैयालालचा फोटो शेअर करत लिहिले की, “नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्यामुळे या निर्घृण हत्या करण्यात आली आणि जिहादींनी हा व्हिडीओ केला. ते लोक दुकानात जाणीवपूर्वक घुसले. त्यानंतर मोठमोठ्या घोषणा देऊ लागले. हे सगळं देवाच्या नावावर सुरु होतं.”

नंतर पुढे कंगनाने दुसऱ्या स्टोरीमध्ये हत्या करणाऱ्या व्यक्तींचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “देवाच्या नावावर त्यांनी कन्हैयालालची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर फोटोसाठी अशी पोज दिली. त्यांनी बरेच व्हिडीओ शूट केले. या घटनेने मला हादरवून टाकलं आहे. ते व्हिडिओ पाहण्याची माझ्यात हिंम्मत नाही.” कंगनाची या पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

उदयपूर हत्याप्रकरण नेमकं काय ?
राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणच्या एका शिवणकाम व्यवसायिकाची मंगळवारी (२८ जून ) निर्घृण हत्या करण्यात आली. हेल्लेखोरांनी त्याच्या दुकानात घुसून त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ल्याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे उदयपूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केलेल्या व्यक्तीचे कन्हैयालाल तेली असे नाव होते. त्याचे उदयपूर येथील धनमंडी या ठिकाणी कपडे शिवण्याचे दुकान आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

