मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना रणौत बिनधास्त बोलते. कंगना रणौतची आवड अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही आहे. तिच्या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात तिचा सहभाग असतो. दरम्यान, 2017 मध्ये आलेल्या ‘सिमरन’ चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी कंगना राणौतबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.
दिग्दर्शक हंसल मेहता यांनी कंगनासोबत ‘सिमरन’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. ‘सिमरन’ 2017 मध्ये रिलीज झाला होता. कंगनासोबत काम करण्याबद्दल हंसल मेहता म्हणाले की, ही त्यांची मोठी चूक होती. त्याचबरोबर कंगना अजूनही मोठी स्टार असल्याचे त्याने कबूल केले. याआधी ‘सिमरन’चे लेखक अपूर्व असरानी यांनी दावा केला होता की, हंसलने प्रोजेक्ट सोडल्यानंतर कंगनाने दिग्दर्शनाची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हा हंसल मेहताने म्हणाले होती की, त्यांच्याकडे हाताळण्यासाठी काहीच उरले नाही कंगनाला जे शूट करायचे होते तेच तिने शूट केले.
एका ऑनलाइन पोर्टलशी बोलताना दिग्दर्शक हंसल मेहता म्हणाले की, कंगना एक ‘टॅलेंटेड’ अभिनेत्री आहे. पण स्वत:वर चित्रपट बनवून त्यांनी स्वत:ला मर्यादित केले आहे. दिग्दर्शक हंसल मेहता हे ‘शाहिद’ आणि ‘सिटी लाइट्स’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात. याशिवाय त्याच्या ‘स्कॅम 1992’ या वेबसिरीजचे खूप कौतुक झाले. या वेब सिरीजमध्ये प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

