Share

kangana Ranaut | पहा कंगना रानौतचा ‘इंदिरा गांधी’ लुक; ‘इमर्जन्सी’ चा टीजर रिलीज

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून हे स्पष्ट होते की, चित्रपटाची कथा देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठी घटना म्हणजेच आणीबाणीवर आधारित आहे. कंगना या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत असून आता या चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. अगदी परफेक्ट मेकअप, हेअर स्टाईल आणि वेषभूषेमुळे कंगना हुबेहूब इंदिरा गांधींसारखी दिसते आहे.

कंगना रानौतने इन्स्टाग्रामवर तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. पांढरे केस, चेहऱ्यावर हलक्या सुरकुत्या यामुळे कंगनाचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. या पोस्टरसोबत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आणीबाणीचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे. जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि वादग्रस्त महिलांपैकी एका महिलेची भूमिका साकारत आहे. या फोटोबरोबरच कंगनाने चित्रपटाची एक झलकही दाखवली आहे. ज्यामध्ये 1971 मधील घटना दाखवण्यात आली आहे. अनेक अधिकारी इंदिरा गांधींना मॅडम ऐवजी ‘सर’ संबोधायचे, असे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाच्या लूकपासून ते तिच्या चालण्याच्या, बोलण्याच्या स्टाइलमुळे ती अगदी इंदिरा गांधींप्रमाणे दिसत आहे.

https://www.instagram.com/tv/Cf-rvrGB6Oj/?utm_source=ig_web_copy_link

कधी प्रदर्शित होणार?
‘इमर्जन्सी’ हा चित्रपट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगना या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट 25 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे. नुकतेच कंगनाने एक पोस्टर शेअर करून तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. कंगना रानौत शेवटची ‘धाकड’ चित्रपटात दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. या चित्रपटात कंगना जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसली होती. असे असूनही कंगनाला प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचण्यात यश आले नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!