मुंबई : राजस्थानमधील उदयपूर येथे शिवणकाम व्यवसायिकाची हत्या झाली आहे. यामुळे संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे. या हत्याप्रकरणामुळे राजस्थानमधील काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपींनी हत्येचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रकरणावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आता यामध्ये अनुपम खैर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अनुपम खैर यांनी उदयपूर हत्याप्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. यांनी याबद्दल एक ट्विट केले आहे सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे. ट्विट शेअर करत त्यांनी लिहिले की, “भयभीत… दुःखी… नाराज”. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Horrified… sad…. ANGRY… !#KanhaiyaLal
— Anupam Kher (@AnupamPKher) June 28, 2022
उदयपूर हत्याप्रकरण नेमकं काय ?
राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणच्या एका शिवणकाम व्यवसायिकाची मंगळवारी (२८ जून ) निर्घृण हत्या करण्यात आली. हेल्लेखोरांनी त्याच्या दुकानात घुसून त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ल्याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे उदयपूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केलेल्या व्यक्तीचे कन्हैयालाल तेली असे नाव होते. त्याचे उदयपूर येथील धनमंडी या ठिकाणी कपडे शिवण्याचे दुकान आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

