Share

Uddhav Thackeray : “ज्या खात्यांचे विषय राहिले ते पुढच्या कॅबिनेटमध्ये घेवू”; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आशावाद

Published On: 

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत मदभेदामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. त्यातच काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनिल परब यांनी आजच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीवर ठराव संमती करण्याची मागणी केली होती. यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळात यावर निर्णय झाला. यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही जे सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. जी कायदेशिर प्रक्रिया होईल त्याला सामोरे जाऊ. पाच वर्षे हे सरकार चालणार असे मी म्हणालो होतो, पण माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले.यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलले आणि अत्यंत भावूक होत ते म्हणाले, या अडीच वर्षात तुम्ही खूप सहकार्य केले. जर माझ्या कडून कोणाचा अपमान झाला असेल, दुखावले असेल तर मी माफी मागतो. तसेच ज्या खात्यांचे विषय राहिले ते पुढच्या कॅबिनेटमध्ये घेवू, असा आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दी. बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!