मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकतंच याबाबत कंगना रणौतचे वक्तव्य समोर आले आहे. कंगना रणौतने सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आता शिवसेनेला वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस पुढची रणनीती ठरवण्यात व्यस्त आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय प्रसंगात आता कंगना रणौतचे वक्तव्य समोर आले आहे. अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला टोला लगावला आहे.
https://www.instagram.com/p/CfazZUTtncR/
कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “पाप वाढलं की सर्वनाश होतो” कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

