🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती वारंवार चर्चेत येत असते. मात्र या वेळेस तिचा चर्चेचा विषय काही वेगळाच आहे. अलीकडेच कंगणाला फिल्मफेअर अवाॅर्ड साठी नाॅमिनेट करण्यात आलं होतं. मात्र तिचं नाॅमिशेन परत घेण्यात आलं आहे.
कंगणा राणावत हिचे मॅगझिनवर खोटे आरोपः
कंगणा राणावतला ‘थलाईवी’ या चित्रपटासाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. मात्र यानंतर कंगनाने मॅगझिनच्या विरोधात खोटे आरोप केले. त्यामुळे तिचं नॉमिनेशन माघार घेण्यात आलं आहे. एवढंच नाही तर मॅगझिनने देखील याबाबत एक मोठं स्टेटमेंट पब्लिश केलं आहे.
फिल्मफेअर अवाॅर्ड यांचं स्पष्टीकरणः
प्रदर्शित केलेल्या मेसेजमध्ये त्यांनी पुरावे देखील जोडले आहेत. कंगणाला निमंत्रण दिलेला मेसेज त्यांनी जोडला आहे. यामध्ये अवॉर्ड फंक्शन मध्ये आमंत्रित करण्यात आलं यावेळी कंगणाला कोणत्याही प्रकारचा परफॉर्मन्स करण्यासाठी सांगण्यात गेलं नव्हतं, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये स्पष्टपणे कंगनाला 30 ऑगस्ट रोजी मुंबईच्या बीकेसी च्या जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर मध्ये उपस्थिती लावण्यासाठी विनंती करण्यात आली होती. याने सिट रिझर्व करण्यात मदत होईल तसेच तिच्या घरातचा पत्ता पाठवण्यासाठी विनंती करण्यात आली होती ज्यामुळे तिला आमंत्रण पत्र पाठवता येईल, असं त्या मेसेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, मॅक्झिनने केलेल्या पोस्टमध्ये कंगणा राणावतच्या आरोपांना खोटं असल्याचं सांगितलं आहे. विशेष बाब म्हणजे याआधी कंगणाला पाच वेळा फिल्म फेअरचा अवॉर्ड मिळाला आहे. ज्यामधील दोन अवाॅर्ड फंक्शनला तिची उपस्थिती नव्हती.
महत्वाच्या बातम्याः
- Attack On CM Convoy । मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक, स्थानिकांनी फोडल्या गाडीच्या काचा
- आदरणीय नेत्यांचा अपमान करणारे, हे कसले राम हे तर हराम- अरविंद सावंत
- Amravati।अमरावतीत क्रीडा विद्यापीठासाठी शासनस्तरावर लवकरच समिती नेमणार; फडणवीसांची ग्वाही
- Shivsena। आत्महत्येच्या टोकावर शेतकरी; कुठे फेडणार हे पाप?; शिवसेनेचा सरकारला आक्रमक सवाल
- Sanjay Shirsat| “अतुल सावे यांनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदे यांच्याकडून 50 कोटी आणले”, – संजय शिरसाट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
