ठरलं तर…! ‘हा’ खेळाडू देणार रोहित शर्मा बरोबर सलामी

अहमदाबाद: उद्या दिनांक ६ फेब्रुवारी पासून वेस्टइंडीजचा मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारत दौरा सुरु होणार आहे. या वेस्टइंडीजच्या भारत दौऱ्यात अहमदाबाद येथे ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. हे तीनही सामने अहमदाबाद येथील श्री.नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहेत. या तीन एकदिवसीय सामन्यांनंतर कोलकत्ता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर ३ टी-२० सामने होणार आहेत. ही वेस्टइंडीज विरुद्धची ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होण्या आगोदरच भारताला कोरोना विषाणूचा तडाखा बसला आहे. भारतीय एकदिवसीय संघातील एकूण ७ जण कोरोना विषाणूने बाधित झाली आहेत. त्यापैकी ४ जण खेळाडू तर ३ जण सपोर्ट स्टाफ मधील लोक आहेत.

शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि भारताचा जलदगती गोलंदाज नवदीप सैनी हे चार प्रमुख खेळाडू कोरोना विषाणूने बाधीत झाले आहेत. शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड़ हे भारताचे हक्काचे सलामीवीर फलंदाज कोरोना विषाणूने बाधीत झाल्याने आता रोहित शर्मा बरोबर एकदिवसीय सामन्यात सलामीला कोण जाणार हा प्रश्न भारतीय संघासमोर उभा ठाकला होता.

मात्र भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानेच त्याच्या बरोबर कोण सलामीला उतरणार याचा खुलासा केला आहे. ईशान किशन रोहित शर्मा बरोबर वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामीला उतरणार आहे. याबाबत अजून बोलताना रोहित शर्मा म्हणाला कि, ”माझ्या बरोबर उद्यापासून सुरु होणाऱ्या वेस्टइंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ईशान किशन हा सलामीला उतरेल. अजून कोणताही पर्याय समोर नसल्याने ईशान किशनचे नाव सलामीला अंतिम करण्यात आले आहे. मयांक अगरवाल हा पर्याय पण समोर होता परंतु मयांक आगरवाल सक्तीच्या ७ दिवसांच्या विलगीकरणात असल्याने त्याचे नाव सलामीला घेता येणार नव्हते.

          महत्वाच्या बातम्या :