आधी मृत्यूला झुंज दिल्यानंतर क्रिकेटर आता कॅन्सरमुळे व्हीलचेयरवर

मुंबई :  न्यूझीलँडचा माजी अष्टपैलू खेळाडू क्रिस केर्न्सचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. ५ महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. ते अनेक दिवस लाइफ सपोर्ट सिस्टीमवर होते. यातून ते नुकतेच बरे झाले होते की त्यांना अर्धांगवायू झाला आणि ते व्हीलचेअरवर आले आहेत. आता त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. केर्न्सने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

क्रिस केर्न्सने इंस्टाग्रामवर लिहले ” मला काल सांगितले गेले की मला आतड्याचा कर्करोग झाला आहे. हा माझ्यासाठी मोठा झटका आहे आणि नियमित तपासणीनंतर मला जे अपेक्षित होते ते हे नाही. म्हणून, मी सर्जन आणि तज्ञांशी संवादाच्या दुसर्‍या फेरीची तयारी करत असताना, मला आठवते की मी किती भाग्यवान आहे की मी इथे आहे आणि माझे जीवन जगण्यात धन्यता मानते. मी खूप काही करू शकलो. हा आठवडाही वाईट नव्हता. मुलांसोबत गेममध्ये सामील झालो आणि घरी नोहाचा वाढदिवसही साजरा केला. पुढे आणखी एक लढाई आहे. यावेळी हे युद्ध पहिल्या फेरीतच संपेल, अशी अपेक्षा आहे.”

https://www.instagram.com/p/CZkx9xMvO25/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केर्न्स यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांच्यावर एकदा नव्हे तर ४ वेळा ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती. या कारणास्तव ते काही दिवस सिडनीतील रुग्णालयात लाइफ सपोर्ट सिस्टीमवर होते. यातून जेव्हा केर्न्स बरा झाला, तेव्हा त्याला पाठीच्या खालच्या भागात अर्धांगवायू झाला आणि तो व्हीलचेअरवर आला. मात्र, यातून तो झपाट्याने बरा होत होता आणि सोशल मीडियावर त्याच्या पुनर्वसनाशी संबंधित छायाचित्रेही सतत शेअर करत होता. डिसेंबरमध्ये त्याला कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी हॉस्पिटलमधून 2 दिवसांची सुट्टीही मिळाली होती. आता केर्न्स कॅन्सरला लढा देत आहे. केर्न्स पाहिल्यासारखाच हि लढाई सुद्धा जिंकेल अशी आशा आहे.

महत्वाच्या बातम्या