वेस्ट इंडीज दौऱ्याआधी रिषभ पंतला मिळाला मोठा करार ; रोहित आणि विराटच्या यादीत जागा

मुंबई: रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने करोडोंची डील केली आहे. पंतने क्रिकेट किट बनवणारी कंपनी एसजी सोबत ७ वर्ष जुन्या बॅट स्पॉन्सरशिप कराराचे नूतनीकरण केले आहे.त्यांचा हा करार भारतातील सर्वात मोठी बॅट-स्पॉन्सरशिप करार आहे. पंत आता विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर बॅट एंडोर्समेंटद्वारे भारतातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू बनेल. आता पंतला त्याच्या बॅटवर एसजी लोगो वापरण्यासाठी वार्षिक ३ कोटी रुपये मिळतील.

यापूर्वी विराट कोहलीने एमआरएफसोबत ८ वर्षांसाठी १०० कोटींचा बॅट स्पॉन्सरशिप करार केला होता. रोहित शर्माही त्याच्या बॅटवरील कंपनीच्या लोगोमधून करोडोंची कमाई करत आहे. त्याने २०१८ मध्ये सिएट सोबत करार केला होता. या अंतर्गत कंपनी त्याला दरवर्षी 4 कोटी रुपये देते. शिखर धवनला एमआरएफ बॅट स्पॉन्सरशिप डील अंतर्गत दरवर्षी २.५ कोटी रुपये दिले जात होते. मात्र, आता तो करार संपला आहे आणि सध्या तो कुकाबुराच्या बॅटने खेळतो.

रिषभ पंतने झालेल्या करारबाबत आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला ” मी बर्याच काळापासून एसजी बॅट वापरत आहे. माझ्या अनेक अविस्मरणीय खेळी या कंपनीच्या बॅटने आल्या आहेत. ही पार्टनरशिप पुढे नेण्यात मला आनंद होत आहे.” स्पोर्ट्स टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स जी पंतचे व्यवस्थापन बघते त्यांनी असा दावा केला आहे की रिषभ आता बॅट एंडोर्समेंटद्वारे देशातील सर्वाधिक कमाई करणार्‍या क्रिकेटपटूंमध्ये एक बनला आहे. एसजीने राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांसारख्या दिग्गज फलंदाजांशी सुद्धा करार केले आहेत.

महत्वाच्या बातम्या