Goa Elections: “राहुल गांधीना कोण सिरीयस घेतंय…”; गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा: गोव्यासह इतर चार राज्यांमध्ये 2022 मध्ये निवडणुका आहेत गोव्यात 14 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. दहा मार्चला निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. राहुल गांधी सध्या गोव्यामध्ये निवडणुकीच्या प्रचाराला आहेत. कालच त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला.

यावेळी राहुल गांधींनी एक ऑनलाईन जनसभा घेतली. या जनसभेत ते म्हणाले,’खरा हा सामना काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे, बाकीच्या पक्षांना मत देऊन तुमची मत वाया घालवू नका. भाजप गोव्यात कोरोना व्यवस्थापन, पर्यटन आणि जनसामान्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत संपुर्णरित्या यशस्वी ठरली आहे.’ तर यावेळेस काँग्रेस संपूर्ण बहुमताने गोव्यात सरकार स्थापन करेल अशी विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यावर प्रतिक्रिया देत गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतानी राहुल गांधीवर टोला लगावला आहे. ते म्हणाले,’राहुल गांधी येथे पर्यटक म्हणून फिरण्यासाठी आले होते. जर त्यांना विकास दिसत नसेल तर मला नाही कळतं की ते नक्की काय करत आहेत. तसही त्यांना कोणी सिरीयस घेत नाही.’

महत्वाच्या बातम्या: