भाजप या सरकारचा काळा चिठ्ठा खोलण्याच्या तयारीत – चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील पोलीस बदल्यांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांनी नोंदवला आहे. त्यांच्या या खुलास्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधान आले आहे. यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपा या सरकारचा काळा चिठ्ठा खोलण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.

“परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुली घेतल्याचे बोलल्यास ईडी चौकशी केली जाते, आता तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट अनिल परब यांचे नाव घेत अनिल परबच पोलीस बदल्यांचे प्रायवेट चिठ्ठा आम्हाला आणून देत होते. असे म्हटले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखच जर अनिल परबांवर आरोप करत आहेत, तर त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे. भारतीय जनता पक्ष देखील या सरकारचा काळा चिठ्ठा खोलण्याच्या तयारीतच आहे. हे फार काळ चालणार नाही. ‘अब जनता आई है, सिंहासन खाली करो’, अशी वेळ या सरकारवर लवकरच येणार आहे.” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसाठी परिवहन मंत्री अनिल परब आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सह्याद्री अतिथीगृह आणि ज्ञानेश्‍वरी बंगल्यावर गुप्त बैठका व्हायचा, असा धक्कादायक खुलासा देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर यांनी केला आहे. व्हटकर यांनी सक्तवसूली संचालनालयाकडे (ED) नोंदविलेल्या जबाबात ही माहिती दिली आहे. त्यामुळे परब आणि देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या: