Share

कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप; चित्रा वाघ यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची रुपाली ठोंबरेंची मागणी

Published On: 

मुंबई: शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे.मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले असल्याचा दावा या तरुणीने केला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे समोर आले आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre) यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

“कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप,डांबून ठेवणे, फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी, अॅपचा वापर करून एसएमएस पाठवणे, खोटे एसएमएस तयार करणे, खोटी तक्रार देण्यास भाग पाडणे यावरून चित्रा वाघ यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करा.”, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

दरम्यान शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले. चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. पण आता या तरुणीने गंभीर आरोप करत गौप्यस्फोट केला आहे. चित्रा वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकत आरोप करण्यास सांगितले आणि माझ्या मोबाईलमधून एका अॅपच्या सहाय्याने मेसेज पाठविण्यात आले. त्यांनी मला गोव्यात डांबून ठेवलं होतं. असा खुलासा या तरुणीने केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022 CSK vs RCB : आज धोनीची बॅट तळपणार? वाचा कोणत्या संघाचं पारडं आहे जड

सदावर्तेंनी घेतलेल्या रकमेमध्ये खोत आणि पडळकरांचाही वाटा आहे का?; राष्ट्रवादीचा सवाल

IPL 2022 : जेव्हा हार्दिकच्या तळपायाची आग मस्तकात जाते..! मॅचदरम्यान शमीवर काढला ‘असा’ राग; VIDEO व्हायरल!

“फक्त ‘सुशिक्षित’ असून चालत नाही ‘सुजाण’ सुद्धा…” , सुजात आंबेडकरांना मनसेचा जोरदार टोला

“यूपीए अध्यक्षपदासाठी जागा खाली नाही”; शिंदेंनी पवारांना डिवचलं

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!