मुंबई : आयपीएल २०२२च्या २१व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने गुजरात टायटन्सचा ८ गडी राखून पराभव केला. आयपीएलमधील गुजरात टायटन्सचा हा पहिला पराभव आहे. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. सामन्यादरम्यान गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्या मोहम्मद शमीवर संतापलेला दिसला.
या सामन्यात हार्दिक पंड्याने फलंदाजीत आपले कौशल्य दाखवले, पण गोलंदाजीत तो अजिबात लयीत दिसला नाही. त्याने चार षटकांत २७ धावा दिल्या. त्याच्याविरुद्ध केन विल्यमसनने खूप धावा केल्या. हार्दिक १३व्या षटकात गोलंदाजी करत होता. या षटकात विल्यमसनने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने सीमारेषेच्या दिशेने अपर कट शॉट खेळला, मात्र तेथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद शमीने झेलसाठी प्रयत्न न करता फक्त चेंडू अडवला, त्यामुळे हार्दिक रागात दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने १६२ धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्याने ५० धावांची शानदार खेळी केली. त्यांच्याशिवाय मॅथ्यू वेडने १९ आणि डेव्हिड मिलरने १२ धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी उमरान मलिक आणि मार्को जेसनने 1-1 विकेट घेतली. हैदराबादसाठी केन विल्यमसनने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ५७ धावांची खेळी खेळली.
महत्त्वाच्या बातम्या –
- “यूपीए अध्यक्षपदासाठी जागा खाली नाही”; शिंदेंनी पवारांना डिवचलं
- “१३० कोटी जनतेमध्ये मी नरेंद्र मोंदीसारखा आहे म्हणणारा…”, महेश तपासे यांची खोचक टीका
- IPL 2022 : दुष्काळात तेरावा महिना..! चार पराभवानंतर CSKला मिळाली अजून एक ‘वाईट’ बातमी; वाचा झालं काय!
- “अरे बाबा तुझ्या घोटाळ्यावर बोल…”, संजय राऊतांचा सोमय्यांना टोला
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना दिलासा; नितेश राणे म्हणाले, “मविआ सरकारला तोंडावर…”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


