🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी आज (१२ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तसेच सदावर्तेंनी घेतलेल्या रकमेमध्ये खोत आणि पडळकरांचाही वाटा आहे का?, असा खोचक सवालही तपासे यांनी केला आहे.
यावेळी बोलत असतांना महेश तपासे म्हणाले की, ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा जवळपास पाच महिने आझाद मैदानावर सुरु होता. या संपाला जवळपास ९० हजार कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे,अशा घोषणा तिथे करण्यात आल्या होत्या. गोरगरीब, कष्टकरी कामगारांकडून पैसे घेतले नाहीत असे सांगणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी कामगारांकडून आधी प्रति व्यक्ती ५३० रूपये आणि त्यानंतर ३०० रूपये जमा केले, असे काल आम्हाला न्यायालयामार्फत समजले. समजा सदर पैसै हे कायदेशीर फी म्हणून घेतले गेले असतील तर त्या रकमेवर कर लागला पाहिजे. सिल्व्हर ओकवर केल्या गेलेल्या भ्याड आंदोलनातील आंदोलकांना एका चुकीच्या दिशेने नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षामार्फत त्याला खुलं समर्थन देण्यात आलं. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचाही त्या जमा केलेल्या रकमेमध्ये वाटा आहे का? हे तपासले गेले पाहिजे.’
महत्त्वाच्या बातम्या –
- “अरे बाबा तुझ्या घोटाळ्यावर बोल…”, संजय राऊतांचा सोमय्यांना टोला
- IPL 2022 : जेव्हा हार्दिकच्या तळपायाची आग मस्तकात जाते..! मॅचदरम्यान शमीवर काढला ‘असा’ राग; VIDEO व्हायरल!
- “१३० कोटी जनतेमध्ये मी नरेंद्र मोंदीसारखा आहे म्हणणारा…”, महेश तपासे यांची खोचक टीका
- “यूपीए अध्यक्षपदासाठी जागा खाली नाही”; शिंदेंनी पवारांना डिवचलं
- “फक्त ‘सुशिक्षित’ असून चालत नाही ‘सुजाण’ सुद्धा…” , सुजात आंबेडकरांना मनसेचा जोरदार टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
