Share

IPL 2022 CSK vs RCB : आज धोनीची बॅट तळपणार? वाचा कोणत्या संघाचं पारडं आहे जड

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२चा २२वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे होईल. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या चार सामन्यांमध्ये सलग चार पराभवांचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, आरसीबीने आतापर्यंत चार सामन्यांत तीन विजय मिळवले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जने आपला शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादकडून गमावला. दुसरीकडे, आरसीबीने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. अशा स्थितीत आरसीबीचे मनोबल उंचावलेले आहे.

दोन संघांमधील आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सीएसकेचा वरचष्मा आहे. चेन्नई सुपर किंग्जने १८ सामने जिंकले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ सामने जिंकले आहेत. सध्याच्या खेळाडूंमध्ये, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जकडून आरसीबीविरुद्ध सर्वाधिक ८३६ धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध विराट कोहलीने सर्वाधिक ९४८ धावा केल्या आहेत. तर रवींद्र जडेजाने बंगळुरूविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जकडून २३ विकेट घेतल्या आहेत. युझवेंद्र चहलने चेन्नईविरुद्ध बंगळुरूकडून १४ विकेट घेतल्या आहेत, परंतु या आयपीएल हंगामात तो संघाचा भाग नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!