मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी आपण आतापर्यंत किती दंगली बघितल्या, बाबरी मशिद असो किंवा भीमा कोरेगाव असो, दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात, असे वक्तव्य केले आहे.
सुजात आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर आता मनसे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी टीका केली आहे. यासंदर्भात अखिल चित्रे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘”सुशिक्षित” असून चालत नाही “सुजाण” सुद्धा असावं लागतं. अर्थात,पुढारी बनणे हे अत्यंत जबाबदारीचे काम त्यासाठी तुम्ही फक्त उच्चशिक्षित असून चालत नाही.इतरही गुण आत्मसात करणे महत्त्वाचे.पुरोगामी महाराष्ट्रात जातिभेद,उच्च-नीच मानणारे युवक आजही आहेत हे बघून मान खाली जाते.’
दरम्यान, ‘अमित ठाकरे यांना स्वतः वैयक्तिक आमंत्रण दिले नव्हते की, तुम्ही येऊन हनुमान चालिसा म्हणा. मेटाफर किंवा पोएट्री आपण म्हणू शकतो. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की आपण आतापर्यंत किती दंगली बघितल्या, बाबरी मशिद असो किंवा भीमा कोरेगाव असो, दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात. त्यांच्या वक्तव्यावरुन प्रभावित होऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणारे हे बहुजन असतात. माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल, तर बहुजन मुलांच्या अगोदर स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा आणि तुम्ही स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका’, असे सुजात आंबेडकर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “अरे बाबा तुझ्या घोटाळ्यावर बोल…”, संजय राऊतांचा सोमय्यांना टोला
- IPL 2022 : दुष्काळात तेरावा महिना..! चार पराभवानंतर CSKला मिळाली अजून एक ‘वाईट’ बातमी; वाचा झालं काय!
- “सेटिंग करण्याचा प्रयत्न केला पण पप्पू…”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना टोला
- “सेव्ह विक्रांतचा निधी भाजपच्या खात्यात जमा”; किरीट सोमय्यांच्या वकिलाकडून गौप्यस्फोट
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना दिलासा; नितेश राणे म्हणाले, “मविआ सरकारला तोंडावर…”


