Share

“अपक्ष आमदार आमच्या पाठीशी, धनंजय महाडिकांचा विजय होणार” ; आठवलेंचा विश्वास

Published On: 

🕒 1 min read

अंबाजोगाई (बीड): राज्यात राज्यसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे.  राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढाई सुरु असली तरी, भाजपाचे उमेदवार धनंजय महाडीक हे निश्‍चितच निवडून येतील, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज अंबाजोगाईत येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक गाजत आहे. भारतीय जनता पक्षाच्या धनंजय महाडीक यांना ३२ मते भाजपाकडून मिळणार आहेत. तर उर्वरीत दहा मतांची आवश्यकता हितेंद्र ठाकूर व इतर अपक्ष आमदारांकडून पूर्ण होईल. पहिल्या व दुसर्‍या फेरीतील मतांच्या माध्यमातून महाडीक यांचा विजय निश्‍चित आहे, असे आठवले यांनी म्हंटले आहे. राज्यसभा निवडणुकीत आमच्यावर घोडेबाजार, मतांची फोडाफोडी करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात असे काहीही नाही. राज्यातील अपक्ष आमदार प्रेमानेच भाजपाच्या पाठीशी उभे राहतील अशी स्थिती आहे, असते देखील आठवले म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत स्थापन केलेले सरकार सामान्य शिवसैनिकांना रुचलेला नाही. शिवसैनिकांना ही महाविकास आघाडी मान्य नसल्याने, याचा मोठा फटका पुढील सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला बसणार असल्याचे, आठवले यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या विरोधात कसलाही रोष नाही. गेल्या आठ वर्षात अनेक लोकांच्या उपयोगाची कामे नरेंद्र मोदी सरकारने केली आहेत. मोदींच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही. पुढच्या निवडणूकीत मोदी सरकार ४०० पेक्षा जास्त जागा घेऊन निवडून येईल, असेही मंत्री आठवले यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!