🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने खळबळ माजवणारा भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिकबाबत मोठा दावा केला जात आहे. जम्मू एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या उमरान मलिकने जगातील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा शोएब अख्तरचा विक्रम मोडीत काढल्याचा दावा काही रिपोर्ट्स आणि सोशल मीडियामध्ये केला जात आहे. वास्तविक पाहता, चर्चा सुरू आहे की दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर टीम इंडियाच्या दुसर्या सराव सत्रादरम्यान उमरान मलिकने १६३.७ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे. माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरच्या विक्रमापेक्षा उमरान मलिकने टाकलेल्या चेंडूचा वेग जास्त होता. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात बॉलिंग मशीनवर १६३.७ किमी प्रति तास असे दाखवत आहे.
मात्र, याला बीसीसीआयने अद्याप दुजोरा दिलेला नाही. हे जरी खरे ठरले तरी अख्तरचा रेकॉर्ड अधिकृतपणे कायम राहील कारण उमरान मलिकने सराव सत्रादरम्यान अशी कामगिरी केली आहे. पण यामुळे शोएबच्या रेकॉर्डला धोका वाढला आहे. कारण उमरान मलिकने सराव दरम्यान जर हा चेंडू एवढ्या वेगाने टाकला असेल तर तो सामना खेळताना ही एवढ्या वेगाने चेंडू टाकण्याचा निश्चितच प्रयत्न करेल.
Umran Malik bowled at a speed of 163.7 in yesterday's practice session
#UmranMalikIs this true…?@CricCrazyJohns @mufaddal_vohra pic.twitter.com/dQHFLWAxhz
— ???????????????? ???????????????????? (@saifuddin_111) June 8, 2022
Umran Malik has bowled 163.7 kmph ball in practice session#UmranMalik
Meanwhile Shoaib Akhtar pic.twitter.com/PDbZPaaGJu
— Meme Shastra (@MemeShastra) June 7, 2022
????????
For sure he will break the record ✌️✌️#UmranMalik pic.twitter.com/ZvxIegwgTr
— poorna (@poorna_choudary) June 8, 2022
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने २००२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १६१.३ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून विक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० मैलाचा टप्पा अधिकृतपणे पार करणारा अख्तर हा एकमेव गोलंदाज आहे. जगातील सर्वाधिक पाच वेगवान चेंडूंचा विक्रम अख्तरच्या नावावर आहे.
आयपीएल २०२२ दरम्यान उमरान मलिकने १५० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकून अख्तरच्या विक्रमाच्या जवळ आला होता. या टी-२० स्पर्धेच्या इतिहासात १५७ किमी प्रतितास वेगाने नोंदवण्यात आलेला तिसरा वेगवान चेंडू या २२ वर्षीय तरुणाच्या नावावर आहे. यंदाच्या हंगामात उमरान मलिकने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना २२ बळी मिळवले होते. हंगामात सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
