मुंबई : राज्याच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संघटक श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे आणि भाजप नेते प्रसाद लाड या पाच नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. यात विशेष बाब म्हणजे घटक पक्षाचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांना डावलण्यात आले आहे. भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांना देखील भाजपने नारळ दिला. यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खोचक टोला लगावला आहे.
“सर्वसामान्यांचे कैवारी विनायकराव मेटे,केशव उपाध्ये,विनोद तावडे आणि सदाभाऊ खोत यांच्यावर झालेला अन्याय आम्ही कदापी सहन करु शकत नाही. त्यांच्या या अतीव दुःखात आम्ही सहभागी आहोत. आई भवानी त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.”, असे खोचक ट्वीट आमो मिटकरी यांनी केले आहे.
सर्वसामान्यांचे कैवारी विनायकराव मेटे,केशव उपाध्ये,विनोद तावडे आणि सदाभाऊ खोत यांच्यावर झालेला अन्याय आम्ही कदापी सहन करु शकत नाही.त्यांच्या या अतीव दुःखात आम्ही सहभागी आहोत.आई भवानी त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 8, 2022
दरम्यान विनायक मेटे यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. विनायक मेटे म्हणाले, “भाजपसोबत आम्ही मित्रपक्ष म्हणून २०१४ पासून काम करत आहोत. आज विधान परिषदेची नावे जाहीर झाली आहेत. ते पाहिल्यानंतर आपल्यावर अन्याय झाल्याची सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. भाजपने मित्र पक्षांवर अन्याय केला. आधी सत्ता असताना सुद्धा सर्व मित्र पक्षांना मंत्रीपदे दिले मात्र शिवसंग्रामाला दिले नव्हते. तेव्हाही आमच्यावर अन्याय झाला. २०१९ च्या तिकीट वाटपात सुद्धा अन्याय झाला. आता विधानपरिषदेसाठी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांनी आम्हाला शब्द दिला होता. त्यांनी ते पाळले नाहीत. याबाबत दोन आमदार आणि मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटणार आहोत.”
महत्वाच्या बातम्या:
- ‘आश्रम ४’ मधील बाबा निरालाच्या भूमिकेसाठी बॉबी देओलने ठेवली होती ‘ही’ अट
- आता ‘B’ टीम पण मत देणार का हे देखील जाहीर करून टाका; ‘राष्ट्रवादी’चा आशिष शेलार यांना टोला
- इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; ‘या’ पंधरा मुद्द्यांवर भाषणात बोलण्याची केली मागणी
- महिला क्रिकेट जगतावर ‘राज’ करणाऱ्या ‘मिताली’चा क्रिकेटला रामराम; वाचा!
- “सभेपूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगाबादसाठी निधी मंजूर केला” ; रावसाहेब दानवेंचा आरोप


