Share

“सभेत संभाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर आणून ठेवतील पण…”, शालिनी ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: औरंगाबाद शहरात आज (८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची जाहीर सभा होणार आहे. आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शिवसैनिकांनी पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा उल्लेख केला आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

“सभेत संभाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर आणून ठेवतील पण समाजवादी आणि एमआयएम पक्षाचे मतदान राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हवे आहे यासाठी संभाजीनगरचे नामांतरची घोषणा मात्र आजच्या सभेत कलानगरचे टोमणे सम्राट सर्किट करूच शकत नाहीत. सत्तेसाठी किती ही लाचारी.”, असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jali) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित १५ मुद्द्यांवर भाषण करण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद येथे ८ जून रोजी पूर्वनियोजित सभेत आपण नेहमी प्रमाणे धार्मिक मुद्दे मंदिर-मस्जिद , हिंदु-मुस्लिम , औरंगाबाद- संभाजीनगर नामांतरण आणि इतरांवर राजकीय टिका-टिपण्णीचे भाषण देऊन औरंगाबादकरांची विकासाच्या मुख्य मुद्यावरून दिशाभुल न करता औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित असलेले मुलभुत सुविधेची कामे , प्रकल्प व प्रस्ताव पूर्ण होणार आहे किंवा नाही, याबाबत खुलासा करावा. अशी मागणी इम्तियाज जलील यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!