औरंगाबाद : राज्यसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून आता निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. आल्या सर्व आमदारांना एकत्र आणून त्यांना हॉटेल मध्ये ठेवण्यात आलेले आहे. या निमित्ताने ‘हॉटेल पॉलिटिक्स’ असा वेगळा राजकीय पॅटर्न पाहायला मिळत आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एक एक मत आपल्या पारड्यात पाडण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोघांमध्ये चढाओढ दिसून येत आहे, अशातच राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे हे राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील असा दावा मंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी केला आहे. आता त्यांच्या या दाव्यामुळं राज्यसभेच्या निवडणुकीत अधिक चुरस पहायला मिळणार आहे. निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले, “आम्हाला जर राज्यसभेसाठी एखादं मत कमी पडत असेल तर, आम्ही आमच्या भोकरदन मधील एक आमदार आहेत रावसाहेब दानवेंचे चिरंजीव त्यांना आम्ही आमच्या सोबत निश्चित घेऊ. एमआयएमच्या दोन मतांऐवजी आम्ही दानवे यांच्या एका मताची पूर्तता करुन घेऊ. आम्ही त्यांना विनंती केली आहे, ते आम्हाला मतदान करतील की नाही हे १० तारखेलाच माहिती पडेल.”
मला खात्री आहे की, शिवभाऊ म्हणून ते आम्हाला नक्कीच मतदान करतील. माझ्या उपकाराची परतफेड करायची असेल तर मत द्यावंच लागेल. मी संतोष दानवे यांच्या वडिलांना म्हणजेच रावसाहेब दानवेंना एक लाख मतांची लीड मिळवून दिली होती. त्यामुळं रावसाहेब दानवेंनी त्यांच्या मुलाच्या कानात काही मंत्र दिले. त्यांच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं दोघांचं मला कळालं नाही, मी चहा घेऊन आलो त्यांच्या घरुन, असे सत्तार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :


