Share

IND vs SA : भुवनेश्वर कुमार ‘हा’ विश्वविक्रम मोडण्यापासून एक पाऊल दूर, वाचा!

Published On: 

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना आज राजकोट येथे सुरू आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला 170 धावांचे लक्ष दिले आहे. एकीकडे भारत हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने खेळत आहे. मात्र या सगळ्यात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार विश्वविक्रम रचाण्याच्या मार्गावर आहे. आजच्या सामन्यात तो टी-२० मधील मोठ्या विक्रमाचा मानकरी बनू शकतो.

भारतीय संघ युवा कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामने खेळत आहे. रोहित शर्माच्या विश्रांतीमुळे निवड समितीने या मालिकेत केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्याला दुखापत झाली आणि कर्णधारपद पंतकडे सोपवण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. मात्र भारताने तिसरा सामना जिंकत मालिकेत १-२ असे पुनरागमन केले. आता भारतासाठी मालिकेत टिकून राहण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.

मालिकेतील नंबर वन गोलंदाज

भारतीय संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीतून परतल्यानंतर आता चांगल्या लयीत दिसत आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये तो प्रभावी ठरला आहे. त्याने आतापर्यंत ६ बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत तो जोडीदार युझवेंद्र चहलसोबत संयुक्तपणे पहिला आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला विश्वविक्रम रचण्याची संधी आहे. अनेकदा त्याची पॉवरप्लेमधील गोलंदाजी दिग्गज फलंदाजांवर भारी पडली आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये भुवनेश्वरची गोलंदाजी खेळणे फलंदाजांसाठी नेहमीच कठीण राहिले आहे. त्या गोलंदाजाने आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये ३३ बळी मिळवले आहेत. या यादीत वेस्टइंडीज चा सॅम्युअल बद्री आणि न्यूझीलंडचा टीम साऊदीही त्याच्या बरोबरीत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये १ बळी मिळवून भुवनेश्वर या दोघांनाही मागे टाकून विक्रम आपल्या नावावर करू शकतो. या मालिकेत भुवनेश्वरला आणखी एक सामना खेळायचा आहे त्यामुळे त्याच्यासाठी ही कामगिरी जास्त अवघड वाटत नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!