मुंबई : नेदरलँड्सविरुद्धच्या (ENG vs NED) पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन करत इंग्लंडने काही विक्रम केले. त्यापैकी एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही इंग्लंडने केला आहे. इंग्लंडच्या संघाने त्यांच्या डावात एकूण २६ षटकार ठोकले. पहिल्या वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. इंग्लिश संघाने २०१९ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध हा विक्रम केला होता. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचाच संघ आहे. २०१९ मध्येच इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध २४ षटकार मारले होते. आता इंग्लिश संघ पुन्हा एकदा २६ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे.
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा जोस बटलरने केल्या. त्याने ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. बटलरने ७० चेंडूत नाबाद १६२ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि १४ षटकार दिसले. लियाम लिव्हिंगस्टोननेही ६ षटकार ठोकले. फिलिप सॉल्ट आणि डेव्हिड मलानच्या यांनी अनुक्रमे ३ आणि ६ षटकार ठोकले.
Incredible.
We break our own World Record with a score of 4️⃣9️⃣8️⃣
???????? #NEDvENG ???????????????????????????? pic.twitter.com/oWtcfh2nsv
— England Cricket (@englandcricket) June 17, 2022
इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या केली. इंग्लिश संघाने ४ बाद ४९८ धावा करत नवा विक्रम प्रस्थापित केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडने ४८१ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

