🕒 1 min read
मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा आंतरराष्ट्रीय विक्रम केला आहे. नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने आपल्याच जुन्या ४८१ धावांच्या विश्वविक्रमाला मोडीत काढले आहे. प्रथम फलंदाजी करताना संघाने ५० षटकांत ४ गडी गमावून ४९८ धावा केल्या आहेत. शुक्रवारी नेदरलँड्सविरुद्ध इंग्लंडच्या खेळाडूंनी एक-दोन नव्हे तर, तीन-तीन शतकी खेळी केल्या केल्या आहेत.
फिल सॉल्टने पहिल्याच सामन्यात संस्मरणीय खेळी खेळून इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या फलंदाजाने ९३ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकार मारत १२२ धावांची खेळी केली. दुसऱ्या टोकाला डेव्हिड मलाननेही धडाकेबाज फटके मारत शतक पूर्ण केले. त्याने १०९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १२५ धावा केल्या. या सगळ्यानंतर जोस बटलर च्या बॅटने मैदानावर धावांचा पाऊस पाडला. बटलरने नेदरलँडच्या सगळ्याच गोलंदाजांची तुफान धुलाई केली.
बटलरची झंझावाती खेळी
फिल सॉल्ट आणि डेव्हिड मलान या जोडीच्या धडाकेबाज फलंदाजीनंतर जोस बटलरने मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या ७० चेंडूत १४ षटकार आणि ७ चौकारांच्या सहाय्याने १६२ धावा कुठल्या. जोस बटलर ने त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळी खेळली आहे. त्यानंतर शेवटी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लिविंगस्टनने धडाकेबाज शेवट करत २२ चेंडूत ६६ धावांची तुफानी खेळी केली.
Incredible.
We break our own World Record with a score of 4️⃣9️⃣8️⃣
???????? #NEDvENG ???????????????????????????? pic.twitter.com/oWtcfh2nsv
— England Cricket (@englandcricket) June 17, 2022
इंग्लंडने मोडला त्यांचाच विक्रम
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंड संघाच्या नावावर होता. २०१८ मध्ये नॉटिंगहॅममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात ४८१ धावा केल्या होत्या. आता संघाने नेदरलँड्सविरुद्ध ४ बाद ४९८ अशी मोठी धावसंख्या उभारून आपलाच जुना विक्रम मोडला आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे इंग्लंडचाच संघ आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात ४४४ धावा केल्या होत्या.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या
२०२२ नेदरलँड्स विरुद्ध इंग्लंडने ४ बाद ४९८
२०१८ इंग्लंडने विरुद्ध ऑस्ट्रेलिया ६ बाद ४८१
२०१६ इंग्लंडने पाकिस्तान विरुद्ध ३ बाद ४४४
२००६ श्रीलंकेने नेदरलँड्स विरुद्ध ९ बाद ४४३
२०१५ दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्ध २ बाद ४३९
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
