🕒 1 min read
मुंबई : शरद पवार यांच्या बारामतीला प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट दिली. गुरुवारी गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे रोहित पवार हे अदानी यांच्या स्वागतासाठी स्वत: बारामती विमानतळावर गेले होते. इतकेच नव्हे तर रोहित पवार यांनी स्वत: अदानींची गाडी चालवत त्यांना विज्ञान केंद्रापर्यंत आणले. यानंतर रोहित पवारांच्या गाडी चालवण्यावरून चांगल्याच चर्चा रंगल्या असताना पाहायला मिळाल्या. तसेच नेटकऱ्यांकडून रोहित पवार आणि अदानी यांना ट्रोल देखील करण्यात आले. या प्रकरणी आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या सर्व प्रकरणावर रोहित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “शरद पवारांनी आपल्या पुस्तकात देखील म्हंटल होतं की मी अदानींना खूप वर्षांपासून ओळखतो, स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने ती मैत्री निभावत असतो. लपवून छपवून बाकी करतात तसे करत नाही. जर एखादा व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येत असेल तर त्यांची गाडी आपण चालवली असेल तर त्यात गैर काय आहे?” असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, या घटनेवरून भाजपचे लोकं जे पतंग उडवताहेत ते त्यांनी उडवू नये, त्यांना तेवढंच कळतं शिवाय मी अदानींची गाडी चालवली याच्या चर्चा होत असतील तर होऊद्यात.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
