Share

Asia Cup 2022 : विराट कोहलीसाठी यंदाचा आशिया चषक राहणार आव्हानात्मक; वाचा सविस्तर…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आशिया कप २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. विराटचा आयपीएल नंतर इंग्लंड दौराही चांगला राहिला नव्हता. या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या २० धावा अशी होती. यानंतर विराटला वेस्ट इंडिज दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती. आयपीएल २०२२ हंगाम विराट कोहलीसाठी चांगला राहिला नव्हता. त्याने आयपीएलमध्ये २२.७३ च्या सरासरीने ३४१ धावा केल्या होत्या. इंग्लंड दौऱ्यावर त्याने कसोटीत ११ आणि २० धावा, टी-२० मध्ये १,११ आणि २ तर एकदिवसीय सामन्यात १६ आणि १७ अशा धावा केल्या होत्या.

आशिया चषकची सध्या सर्वच संघांकडून तयारी सुरू झाली आहे. विराट कोहलीच्या पुनरागमनाबद्दल माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विराट कोहलीसाठी आशिया चषक खूप खास असल्याचे म्हटले आहे. एका स्टार स्पोर्ट्स शोमध्ये बोलत असताना ते म्हणाले, ‘विराट कोहलीसाठी आशिया चषक नक्कीच खास असणार आहे. ते म्हणाले की बाकीचे फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. एकूणच आशिया चषकासाठी निवडलेला संघ चांगला असून त्यात चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, असेही ते म्हणाले. आर अश्विन गोलंदाजीसोबतच चांगली फलंदाजी करत आहे. अक्षर पटेलने देखील वर्षभरात चांगली फलंदाजी केलेली आहे.

गोलंदाजी लाइनअपबाबत किरण मोरे म्हणाले की, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांच्या निवडीमुळे तो खूश आहे. रवी बिश्नोईच्या आगमनाने संघात विविधता येईल, असे ते म्हणाले. अर्शदीपबाबत ते म्हणाले की, आम्ही डाव्या हाताच्या गोलंदाजाच्या शोधात होतो आणि तो शोध अर्शदीपमध्ये संपला आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकावीरही ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!