Share

PM Modi : रवींद्र जडेजा सध्या क्रिकेट खेळत नाही, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का केले कौतुक? वाचा!

Published On: 

मुंबई : बीसीसीआयने आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या या दोन अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळाली आहे. रवींद्र जडेजा वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टी-२० भारतीय संघाचा भाग होता. परंतु ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने फक्त एकच सामना खेळला आहे. दुखापतीमुळे तो मालिकेतील उर्वरित सामने खेळू शकला नाही. पण जडेजा न खेळता सध्या भरपूर चर्चेत आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविंद्र जडेजाचे प्रशंसा करत त्याला कौतुकाचे पत्र पाठवले आहे. खुद्द जडेजाने त्याच्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

रवींद्र जडेजा आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलीच्या ५ व्या वाढदिवसानिमित्त पोस्ट ऑफिसमध्ये १०१ मुलींची सुकन्या समृद्धी खाती उघडली आहेत. केंद्र सरकारची ही योजना आहे, ज्याचा लाभ सर्व मुलींना मिळत आहे. या कामाची प्रशंसा करत पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे. समाजाप्रती तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांचे सरकार कौतुक करते, असे पत्रात लिहिले आहे. रवींद्र जडेजाने कोरोनाच्या काळातही लोकांना खूप मदत केली होती. त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांनीही त्यांचे कौतुक केले होते.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवींद्र जडेजा संघाचा भाग होता पण दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो मैदानात उतरला होता. त्या सामन्यात त्याने २७ धावा केल्या तर गोलंदाजीत ३ षटकात १६ धावा देऊन १ बळी घेतला होता. आता पुन्हा एकदा त्याचा आशिया चषक स्पर्धेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. यावेळी टीम इंडियासाठी रविंद्र जडेजाकडून चाहत्यांना मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!