Share

IND vs SA 4th T20 : कार्तिकच्या तुफान बॅटिंगमुळं भारताचं आफ्रिकेला १७० धावांचं आव्हान!

Published On: 

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात टी-२० मालिकेचा चौथा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात आफ्रिकेचा कप्तान टेम्बा बावुमाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून पहिल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर हार्दिक पंड्या-दिनेश कार्तिकनं डाव सावरत सन्मानजनक धावसंख्या उभारली. कार्तिकच्या स्फोटक आणि पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतकामुळे भारताने आफ्रिकेला १७० धावांचे आव्हान दिले.

भारताचा डाव

आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (५) स्वस्तात बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेले श्रेयस अय्यर (४), कप्तान ऋषभ पंत (१७) हे फलंदाजही डाव सावरू शकले नाहीत. इशान किशनने २७ धावा केल्या, पण तो सातव्या षटकात बाद झाला. ४ बाद ८१ अशी धावसंख्या असताना हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांनी अर्धशतकी भागीदारी केली. कार्तिकने तुफानी अंदाजात फलंदाजी करत २७ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा केल्या. शेवटच्या षटकात तो बाद झाला. हार्दिकने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. २० षटकात भारताने ६ बाद १६९ धावा फलकावर लावल्या. एनगिडीने आफ्रिकेकडून सर्वाधिक २ बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत – ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ड्वेन प्रिटोरियस, रासी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, लुंगी एनगीडी, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!