Share

Asia Cup 2022 : आशिया चषकसाठी भारतीय संघ निवडीवर माजी कर्णधार नाराज, म्हणाला…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आशिया चषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात केवळ तीन वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि युवा अर्शदीप सिंग यांना संघात स्थान मिळाले आहे. पण भारताचा माजी कर्णधार आणि निवडकर्ता या संघ निवडीवर खूश नाही. वास्तविक पाहता कृष्णमाचारी श्रीकांतची नाराजीही गरजेची आहे. कारण या लाइनअपमध्ये जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत भुवनेश्वर कुमार व्यतिरिक्त संघात आणखी एक अनुभवी गोलंदाज असायला हवा होता. मात्र असे घडले नाही.

आशिया चषक संघात मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीमुळे तो टी-२० विश्वचषक खेळणार की नाही याविषयीच्या अटकळांना उधाण आले आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा संघात समावेश व्हावा, अशी श्रीकांतची इच्छा होती. सध्या निवड समितीने गोलंदाजी लाइनअपमध्ये ३ वेगवान गोलंदाज तसेच ३ फिरकीपटूंची निवड केली आहे.

युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या जागी अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमीला संधी द्यायला हवी होती, असे माजी निवडकर्त्याने सांगितले आहे. स्टार स्पोर्ट्सच्या एका शोमध्ये बोलताना तो म्हणाला की, ‘ आशिया चषकसाठी शमीही माझ्या टीममध्ये राहिला असता. मी निवड समितीचा अध्यक्ष असतो तर तो संघात असता असे मला वाटते. कारण रवी बिश्नोई सोबत गेलो नसतो. मला वाटतंय की अक्षर पटेल माझ्या संघात राहिला असता. माझ्या संघात अक्षर पटेल आणि अश्विन यांच्यातील जागेसाठी लढत राहिली असती.

मोहम्मद शमीबद्दल बोलायचे तर तो गेल्या टी-२० विश्वचषकापासून संघाचा भाग नाही. मात्र, आयपीएल २०२२ मध्ये त्याने गुजरात टायटन्ससाठी चांगली गोलंदाजी केली होती. पॉवरप्लेमध्ये विकेट्स मिळवण्यात तो त्याच्या संघासाठी जवळजवळ प्रत्येक वेळी यशस्वी ठरला आहे. परंतु संघबांधणीचा बराचसा भाग त्याच्या विरोधात गेला आणि त्याला संघात स्थान दिले गेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!