Share

Asia Cup 2022 : आयपीएलनंतर एकही सामना खेळला नाही, तरीही मिळाली संघात जागा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केएल राहुलला पुन्हा एकदा टी-२० आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. त्याला पुन्हा संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. आयपीएल २०२२ मध्ये राहुलने बॅटने चांगली कामगिरी केली होती. पण यानंतर दुखापती आणि कोरोनामुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. दुखापतीमुळे तो नंतरच्या काळात तो संघाबाहेरही होता. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टी-२० आशिया चषकासाठी त्याला पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. अखेर दुखापतीतून पुनरागमन करून एकही सराव सामना न खेळता एवढ्या मोठ्या स्पर्धेत त्याला संधी मिळाली आहे.

आयपीएलचे सामने दरवर्षी आयोजित केले जातात आणि केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून महान खेळाडू या स्पर्धेत उतरतात. आयपीएलमध्ये केएल राहुलची कामगिरी अतुलनीय राहिली आहे. त्याने सलग ५ हंगामात या स्पर्धेत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ वेळा ६०० हून अधिक धावा केल्या आहेत. इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला हे करता आलेले नाही. आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स या नवीन संघाचा कर्णधार होता. के एल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाने प्लेऑफपर्यंतचा प्रवासही केला होता.

केएल राहुलने आयपीएल २०२२ मध्ये अप्रतिम फलंदाजी करत २ शतकांसह ६१६ धावा केल्या . त्याने १५ सामन्यात ५१ च्या सरासरीने ६१६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली होती. त्याचा स्ट्राइक रेट १३५ असा राहिला होता. मागील हंगामात नाबाद १०३ धावांची सर्वोत्तम खेळी खेळली होती. आयपीएलमध्ये त्याने २०२१ मध्ये ६२६ धावा, २०२० मध्ये ६७० धावा, २०१९ मध्ये ५९३ आणि २०१८ मध्ये ६५९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने आयपीएलच्या १०९ सामन्यांमध्ये ४८ च्या सरासरीने ३८८९ धावा केल्या आहेत. राहुलने आयपीएल मध्ये ४ शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत.

केएल राहुलसमोरही यावर्षी मोठे आव्हान असणार आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. त्या दृष्टीने त्याच्यासाठी आशिया चषक महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे राहुलला या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. येथे भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकासारख्या माजी जागतिक संघांसोबत खेळावे लागेल. गेल्या टी-२० विश्वचषकात भारताची कामगिरी चांगली राहिली नव्हती. संघ साखळी फेरीतच बाहेर पडला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!