🕒 1 min read
मुंबई : इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यातील ३ एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ॲमस्टेलवीन येथे खेळला जात आहे. इंग्लंडचा संघ जवळपास १ वर्षानंतर एकदिवसीय सामना खेळत आहे. त्यांनी शेवटची एकदिवसीय मालिका पाकिस्तानविरुद्ध खेळली होती. या सामन्यात नेदरलँडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा निर्णय योग्य ठरला. कारण सामन्याच्या दुसऱ्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का बसला. इंग्लंडकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला जेसन रॉय दुसऱ्याच षटकातच बाद होऊन तंबूत परतला.
जेसन रॉयला त्याचाच भाऊ शेन स्नेटरने बाद केले. स्नेटर सामन्यातील त्याचे वैयक्तिक पहिलेच षटक टाकत होता. पहिल्या दोन चेंडूंवर रॉयला एकही धाव घेता आली नाही. यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर रॉयला त्रिफळाचीत केले. स्नेटरचा चेंडू थोडासा स्विंग घेऊन आतमध्ये आला. रॉयला ते कळले नाही आणि त्याने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेत यष्टींवर आदळला. जेसन रॉय सामन्यात फक्त १ धाव करून बाद झाला. जेसन आणि शेनची आई दोघी बहिणी आहेत आणि त्या झिम्बाब्वेच्या आहेत. यामुळे जेसन आणि स्नेटर हे दोघे भाऊ आहेत.
Early wicket for the hosts as Jason Roy is dismissed by his cousin ????
Watch Live: https://t.co/oHQ2mCZ6bu
???????? #NEDvENG ???????????????????????????? pic.twitter.com/879XDhx7r9
— England Cricket (@englandcricket) June 17, 2022
सॉल्टने पहिले शतक झळकावले
या एकदिवसीय सामन्यात तो आपल्या भावाला पहिला गडी म्हणून बाद करेल असे स्नेटरला कधीही वाटले नसेल. पण असे वास्तवात घडले आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. दुसऱ्या षटकात इंग्लंडला पहिला धक्का बसला होता. मात्र इंग्लंड संघाच्या फलंदाजीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. डेव्हिड मलान आणि फिल सॉल्ट या जोडीने वेगवान फलंदाजी सुरू ठेवली आणि १५ व्या षटकातच इंग्लंडची धावसंख्या १०० च्या पुढे गेली. यादरम्यान फिल सॉल्टने चौकारांसह ५० धावा पूर्ण केल्या. हे त्याचे वनडेतील दुसरे अर्धशतक होते. सॉल्टने केवळ ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सॉल्ट इथेच न थांबता लवकरच पहिले शतक झळकावले. त्याने अवघ्या ८२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्याशिवाय मलाननेही आपले अर्धशतक पूर्ण केले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
