औरंगाबाद : शहरात दररोज हजारांहून अधिक रुग्णसंख्या निघत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रनेवरील ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खासगी व सरकारी रूग्णालयांतील बेड्स अपुरे पडत असल्याने आजघडीला तब्बल चार हजार ६७२ कोरोना रुग्ण स्वतःचाच घरी होम आयसोलेट झाले आहेत. तर सहा हजार रुग्ण सरकारी आणि खासगी रूग्णालयांत उपचार घेत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी शहरातील दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या २० ते २५ वर आली होती. मात्र मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. आजघडीला रोजचे १२०० ते १८०० रुग्ण निघू लागले आहेत. मात्र एवढ्या रुग्णांना उपचार देण्यात महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग अपयशी ठरले आहेत.
काही दिवसांपासून पालिकेचे कोवीड केअर सेंटर्स, घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शहरातील खासगी रूग्णालये देखील कोरोना रुग्णांची हाऊसफुल झाले आहेत. नवीन रुग्णांना बेडस मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे दररोज निघणार्या नवीन रुग्णांचा ओघ कमी होण्याऐवजी आणखी वाढतोच आहे.
त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गंभीर नसलेल्या रुग्णांना स्वत:च्या घरातच राहून होम आयसोलेशनमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. बेड्स उपलब्ध नाहीत, तुम्ही घरातच उपचार घ्या, असे सांगण्यात येत असल्याने या रुग्णांनाही नाईलाजाने होम आयसोलेट व्हावे लागत आहे. मात्र यासाठी खासगी डॉक्टरांची मनमानी उपचार शुल्कही रूग्णांना भरावे लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉकडाऊननंतरच राबवणार जम्बो लसीकरण मोहीम
- ‘काँग्रेसचं सरकार नाही पण सरकार काँग्रेसमुळे आहे’; पटोलेंचा राऊतांना निर्वाणीचा इशारा
- ‘एमपीएससी परीक्षेतून होणारे संघीकरण व भाजपधार्जिण प्रचार रोखा’
- काँग्रेसचे झुंजार प्रवक्ते सचिन सावंत अडकले कोरोनाच्या विळख्यात; स्वतः ट्विट करून दिली माहिती
- ४१ जागा भाजी बाजारासाठी फिक्स, मनपा प्रशासनाचा निर्णय


