Share

राज्य सरकारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा; भाजप आमदाराची मागणी

Published On: 

बुलढाणा : राज्यात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनाचा उपक्रमही राबवण्यात येतो. मात्र सरकारने या कुटुंब नियोजनाच्या किट मध्ये आशा वर्कर्स ना रबरी लिंग देऊन पेचात पाडलं आहे.

प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडुन ऑफ कॅमेरा सांगण्यात आले आहे. मात्र हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील महिला समोर जायचं कस या विवंचनेत ह्या आशा वर्कर्स असल्याचं पाहायला मिळालं. आम्ही काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सरकार विरोधात बोलायला साफ नकार दिला. त्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार या आशा वर्कर्स सहन करत आहेत.

कुटुंब कल्याण योजना राबविण्याचे सरकारने आदेश दिले यावरून लक्षात येते की हे सरकार निर्लज्ज झालेला आहे. राज्य सरकारने यांनी महिलांची व आशा वर्कर यांची विटंबना केली आहे. या माध्यमातून महिलांच्या स्त्रीत्वाचा अपमान केला असून विनयभंग केला आहे. या राज्य सरकारवर व संबंधीतांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करावे. असं जर झालं नाही तर भारतीय जनता पार्टी कडून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे.असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!