Share

४१ जागा भाजी बाजारासाठी फिक्स, मनपा प्रशासनाचा निर्णय

Published On: 

औरंगाबाद :जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. याचा विचार करून याठिकाणी किरकोळ विक्रेते,शेतकरी, ग्राहकांसाठी बंदी आणली गेली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी किरकोळ विक्रेत्यांसाठी शहरातील ९ झोनमधील ४१ ठिकाणी जागा दिल्या आहेत. याठिकाणी आता हे विक्रेते आपल्या भाज्या फळे वस्तू विक्री करतील.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने ३१ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील जाधववाडी बाजारात ग्राहक – विक्रेत्यांची होत असलेली गर्दी टाळण्यासाठी याठिकाणी आता केवळ ठोक विक्रेत्यांना परवानगी देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच ग्राहक, शेतकरी, किरकोळ विक्रेत्यांना येथे परवानगी नसेल. त्यांच्यासाठी शहरातील ४१ ठिकाणी पॉईंट नेमून देण्यात आले आहेत.

या निर्णयासाठी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभापती राधाकिसन पठाडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा व्यापारी संघ अध्यक्ष जगन्नाथ काळे, सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत महापालिका, जिल्हा प्रशासन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे सदर निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाचा भंग करत अवैधपणे भाजीपाला विक्री करतांना कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय यात घेण्यात आला. तसेच हातगाडीचालकांना नियम पाळत गल्लोगल्ली जात विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!