मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. राज्यातील अनेक शहरांत बेड्सची संख्या अपुरी पडू लागले आहेत.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलिब्रेटी आणि नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. यातच आता काँग्रेसचे झुंजार प्रवक्ते सचिन सावंत यांना देखील करोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत: याविषयी माहिती दिली.
सचिन सावंत यांनी ट्विट करून म्हटलं की, ‘माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क परिधान करा. आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या असे म्हटले आहे.
माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क घाला. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.????
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 30, 2021
दरम्यान,दुसऱ्या लाटेत पर्यावरण मंत्री आमिर खान,आदित्य ठाकरे, त्यांची आई रश्मी ठाकरे, तसंच मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील करोनाच्या विळख्यात सापडले होते.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबाद जिल्हा; एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट!
- ‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’
- शार्दुल-भुवनेश्वरला पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, म्हणाला…
- पोटात दुखू लागल्याने खा.शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला कोव्हिड वॉर रुमचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

