औरंगाबाद : शहरात जम्बो लसीकरण मोहिम राबवण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. मात्र त्यातच आता शहरात ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. या काळात लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणाची जम्बो मोहीम लॉकडाऊननंतरच हाती घेण्याचा विचार महापालिका करत आहे.
शहरात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरणाची जम्बो मोहीम रावण्याचा निर्णय पालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी जाहीर केला आहे. शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून आजवर पहिल्या टप्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना लस देण्यात आली. दुसर्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर आणि तिसर्या टप्यात ६० वर्षांवरील व ज्यांचे वय ४५ पेक्षा जास्त आहे, मात्र त्यांना गंभीर आजार आहे अशा लाभार्थ्यांना लस देण्यास सुरूवात झाली आहे.
शहरात आजवर ३७ केंद्रांवरून ९२ हजार ५०४ नागरिकांना पहिली व दुसरी लस दिली आहे. त्यानंतर आता चौथ्या टप्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. जम्बो मोहिमेअंतर्गत ३ लाख नागरिकांना लसीकरण करण्याचे टार्गेट प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून ही मोहीम सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र लॉकडाऊन लागू झाल्याने या काळात नागरिकांना मुभा दिली असली तरी कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतरच ही मोहीम राबवण्याचा विचार मनपा करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एमपीएससी परीक्षेतून होणारे संघीकरण व भाजपधार्जिण प्रचार रोखा’
- काँग्रेसचे झुंजार प्रवक्ते सचिन सावंत अडकले कोरोनाच्या विळख्यात; स्वतः ट्विट करून दिली माहिती
- ४१ जागा भाजी बाजारासाठी फिक्स, मनपा प्रशासनाचा निर्णय
- देशातील टॉप-१० कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या ‘या’ आठ जिल्ह्यांचा समावेश !
- जालन्यात लिक्विड ऑक्सिजनचा वापर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

