मुंबई : गेल्या काही दिवसांपासून यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेनेकडून विविध सल्ले देण्यात येत आहेत. यातच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.
दरम्यान,याच मुद्द्यावरून आता कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. काँग्रेसने मात्र राऊत यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांमधील तणाव वाढताना दिसत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांना ठणकावलं आहे.
‘आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल ते सातत्याने वक्तव्य करत आहेत. याआधी देखील शिवसेना युपीएचा घटक नसल्याने त्यांनी याबाबत बोलू नये असं सांगितलं. पण तरीही ते सातत्याने आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. आता त्यांना आम्ही सांगितलं आहे की, आम्ही सरकार नाही पण सरकार आमच्यामुळे आहे,’ असं सूचक भाष्य करत नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेची आठवण करून दिली आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच राहील – बाळासाहेब थोरात
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. ‘संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते संपादकही आहेत. महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, तरीही संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच राहील. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही,’ असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसचा पवारांकडे कानाडोळा ? केंद्रातील काँग्रेस नेत्यांनी पवारांची विचारपूसच केली नाही !
- ‘मागील वर्षी थाळ्या हि वाजवल्या व “कोमट पाणी” ही प्यायले, पण आता…’; मनसेची खोचक टीका
- लॉकडाऊनमुळे राष्ट्रवादीत बिनसलं? आता प्रफुल्ल पटेल यांचाही विरोध
- काँग्रेसचे झुंजार प्रवक्ते सचिन सावंत अडकले कोरोनाच्या विळख्यात; स्वतः ट्विट करून दिली माहिती
- देशातील टॉप-१० कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या ‘या’ आठ जिल्ह्यांचा समावेश !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

