Share

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही वर्षापूर्वी मराठा आरक्षणाचा लढा आक्रमकतेने सुरु होता. मराठा आरक्षणाचा लढा देत असताना अनेकांनी बलिदान दिले. या आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात यावी याचीही मागणी वारंवार केली गेली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचेही राजेशे टोपे यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या नातेवाईकांना 10 लाखांचे अर्थसहाय्य केले होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिले होते. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणे गरजेचे आहे. आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर महिन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. राजेश टोपे यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादी ट्विटरवरुन शेअर केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!