Share

Yogesh Kedar | “चंद्रकांत पाटलांनी तत्काळ राजीनामा द्यावा”, मराठा क्रांती मोर्चाचे योगेश केदार संतापले

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणा बाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून मराठा मोर्चात फूट पाडल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आम्हीच मराठा समाजाला आरक्षण दिलं असं म्हणत मग फूट पाडण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल चंद्रकांत पाटीलांनी केला आहे. तर चंद्रकांत पाटील मराठा आहेत याची काय व्हॅलेडिटी आहे? असा सवाल योगेश केदारांनी केला आहे.

चंद्रकांत पाटलांनी केलेला गुन्हा गंभीर असून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांची समितीच्या अध्यक्षपदावरून देखील हकालपट्टी देखील करण्यात यावी, ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर जे समोर आले त्यात तथ्य आणि सत्य आहेच. सगळं काही आता समाजाच्या समोर आलं आहे, असं केदार म्हणाले.

मराठा समाजाचा विश्वास चंद्रकांत पाटलांनी गमवला आहे. आमच्या काही लोकांनी काही केलं असेल तर त्यांना बघून घेण्यासाठी मराठा समाज सक्षम आहे. त्यांना समाज नक्की शिक्षा देईल, असं देखील केदार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!