🕒 1 min read
मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनीं सावंतांचा हाच मुद्दा उचलून धरत शिंदे गटावर जोरदार टीका करण्यास सुरवात केली आहे. तसेच बाकी आमदारही टीका करताना वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. या वाचळवीरांना आवर घालण्यासाठी एकनाथ शिंदे आता पुढे आलेत.
शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्री आणि आमदारांवर नाराजी व्यक्त केली. मी बोलत नाही तरी तुम्ही का एवढं बोलता? असा सवालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांना विचारला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत कान टोचले आहेत. पक्ष चिन्हाबाबत विनाकारण भाष्य करु नका. वादग्रस्त वक्तव्य करु नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना केल्या आहेत.
तानाजी सावंत काय म्हणाले होते?
यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे, असं तानाजी सावंत म्हणाले. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं देखील सावंत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas Kadam | शिवसेना का फुटली?, रामदास कदमांचं मोठं विधान म्हणाले…
- NCP | “एकनाथ शिंदे हे भाजपाने वापरलेलं एक हत्यार असून, ते आरएसएसच्या ओंजळीने पाणी पितात”
- Exercise For Heart | हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी दररोज करा ‘या’ एक्सरसाइज
- Benefits Of Honey | मध आरोग्यासाठीच नाहीतर ‘या’ गोष्टीसाठीही आहे फायदेशीर, घ्या जाणून
- Anil Deshmukh । आज पुन्हा अनिल देशमुखांचा जामीन अर्ज न्यायालयाने ठेवला राखून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
