🕒 1 min read
मुंबई: राज्यभरात आरक्षण संदर्भात अनेक मोर्चे निघाले आहेत आणि निघत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण त्याच सोबत धनगर आरक्षण हे विषय ताजे असतानाच आता मुस्लिम आरक्षणासाठी (Muslim Reservation) एमआयएम पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. औरंगाबाद येथून हा मोर्चा एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वात काढण्यात आला आहे. या मोर्च्यात जवळपास ३०० चारचाकी असून अफाट असा हा मोर्चा काढण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईत एमआयएमच्या रॅलीला परवानगी नाही, पोलीस आयुक्तांनी जो आदेश दिला आहे, तोच आदेश अंतिम आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले आहेत. या रॅलीला परवानगी नसल्याचं म्हणत त्यांना अहमदनगर-औरंगाबाद सीमेजवळ अहमदनगर पोलिसांकडून अडवण्यात आलं होतं. मात्र, काही वेळाने काही अटींसह त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मुस्लिम आरक्षणासाठी निघालेला या मोर्चाचे आणखी एक आकर्षण म्हणजे यात पक्षाचा झेंडा न वापरता भारताचा तिरंगा झेंडा वापरण्यात येत आहे.
अहमदनगरच्या सीमेवर पोलिसांनी हा मोर्चा अडवला तेव्हा इम्तियाज जलील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी गाडीवर तिरंगा लावण्यास मनाई केली. त्यावरुन हा वाद झाला. मुंबईला येताना तिरंगा झेंडा लावू नका असा आदेश पोलिसांनी दिला. यावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, हा आमच्या पक्षाचा झेंडा नाही. आमच्या स्वाभिमानाचा हा झेंडा आहे. महाराष्ट्राचा मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का, असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या ‘त्या’ ट्विटवर केशव उपाध्येंचा खोचक टोला; म्हणाले,’स्वतःच्या पक्षाशी…’
- ‘रोहित शर्माला फक्त T20 संघाचा कर्णधार व्हायचे नव्हते तर…’, कर्णधाराबाबत धक्कादायक माहिती समोर
- ‘बाबर आजमसाठी पाकिस्तानचे खेळाडू जीवही देतील’
- झूम मिटिंगमध्ये 900 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढणारे CEO विशाल गर्ग सक्तीच्या रजेवर
- द. आफ्रिका दौऱ्यासाठी उपकर्णधार रोहितची जोरदार तयारी सुरू; पाहा सरावाचा व्हिडिओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
