🕒 1 min read
अमरावती : मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी निषेध केला आहे. तानाजी सावंत यांच्यावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील बोचरी टीका केली. तानाजी सावंत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं मला वाटतं. त्यांचा तो दौरा फेमस झाला होता त्या दौऱ्यानंतर आता हे वक्तव्य आले आहे. सुज्ञ माणूस असं हे वक्तव्य करणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात आणि सगळ्यांनी एक-दुसऱ्याचा आदर केला पाहिजे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी देखील सावंतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कुठल्याही लोकशाहीमध्ये मंत्र्यांनी किंवा मंत्र्याच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी काय टीका करावी हे महत्वाचे नाही. पण मंत्रीपदावर आल्यावर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मंत्री तानाजी सावंत बोलले तोच समाज त्यांचे मंत्रीपद कायमचं काढून घेऊ शकते, एक मात्र नक्की आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
सत्तेत आलं की मराठा क्रांती मोर्चा बद्दल बोलायचे. त्यांचा अपमान करायचा. कोणीही ताम्र पत्र घेऊन जन्माला आले नाही. बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं, असे आमदार धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे.
काय म्हणाले होते तानाजी सावंत?-
सत्तांतर झाल की लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं होतं. यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एससी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे, असं तानाजी सावंत म्हणाले.
दरम्यान, माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका, मुख्यमंत्र्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Vinod Patil | “सरकार कुणाचंही असलं तरी तरुणांची मागणी तीच असेल”, विनोद पाटील
- PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा 2 हजार रुपयांचा हप्ता ‘या’ आठवड्यात येईल शेतकऱ्यांच्या खात्यात
- BJP | “जनाची नाही तर मनाची लाज बाळगा” ; भाजपचा आदित्य ठाकरेंना टोला
- Dhananjay Munde | लोकशाहीत भान ठेवून बोलावे ; धनंजय मुंडेंनी घेतला सावंतांच्या वक्तव्याचा समाचार
- Health Tips | साधे नाही तर मिठाचे पाणी रोज प्या, कारण आरोग्यासाठी आहे ते डबल फायदेशीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
