Share

‘द्रविडची प्रशिक्षकपदी निवड झाली तेव्हाच विराटला कर्णधारपदावरून हटवणार हे निश्चित होतं’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीला (Virat Kohli) हटवल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज दानिश कनेरियाने (Danish Kaneria) देखील तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयने विराट कोहलीसोबत चांगले केले नसल्याचे त्याने म्हटले आहे.

दानिश कनेरियाने आपल्या यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीला ज्या पद्धतीने वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले, त्यावरून देशासह जगभरातील क्रिकेट विश्वात चर्चेला उधाण आले आहे. कोहलीवर अन्याय झाल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे, तर काही लोक रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवणे योग्य मानत आहेत.

दानिश कनेरिया म्हणला की, बीसीसीआयने विराट कोहलीला मान दिला नाही. टी-२० विश्वचषक चांगला झाला नाही, तर विराट कोहलीसोबत कठोर निर्णय घेतला. कर्णधार म्हणून विराट कोहलीने टीम इंडियाला ६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. या बाबतीत तो माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या पुढे आहे.

दानिश कनेरिया पुढे म्हणाला की, विराट कोहलीने विश्वचषकापूर्वी कर्णधारपद सोडण्याविषयी बोलले होते, परंतु बीसीसीआयने त्याला संघाचे नेतृत्व करण्यास सांगितले आणि कामगिरी खराब होताच सर्व काही चुकीचे झाले. दरम्यान, राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून प्रवेश झाला आहे.

कुंबळे जेव्हा प्रशिक्षक होते तेव्हा त्याला विराट कोहलीसोबत जमले नाही. पण रवी शास्त्री कर्णधार विराट कोहलीला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देत होते. आता राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यावर ही जोडी बनणार नाही, असे वाटत होते. विराट कोहली आणि राहुल द्रविड हे पूर्णपणे भिन्न विचारांचे पुरुष आहेत. याच कारणामुळे कोहलीच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले. दानिशच्या मते, काही काळानंतर रोहित शर्मा किंवा युवा कर्णधारही भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होईल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!